कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत लाँग कोविडची लक्षणे दिसू लागली आहेत. यात कोरोनातून रूग्ण बरा होतो, परंतु त्यात पुन्हा किरकोळ लक्षणे दिसू लागतात. त्याचा रिपोर्ट देखील निगेटिव्ह असतो.
लॅन्सेटच्या एका अहवालात म्हटले की, लाँग कोविडचा सामना करणार्या मंडळीत दोनशेपेक्षा अधिक लक्षणे दिसून येत आहेत. शरिरातील वेगवेगळ्या अवयवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. ही लक्षणे किमान सहा महिन्यांपर्यत राहू शकतात.
- संशोधनात म्हटले की, नॅशनल स्क्रिनिंग प्रोग्रमच्या माध्यमातून किती लोकांना लाँग कोविडचा त्रास होत आणि त्यात कोणकोणती लक्षणे आहेत, हे निदर्शनास आले आहे.
- द गार्डियन’मध्ये प्रकाशित अहवालानुसार या संशोधनात सहभागी असलेल्या डॉक्टर ऍथेंना अकरामी या स्वतः लाँग कोविडचे रूग्ण आहेत. त्यांनी म्हटले की, 200 पेक्षा अधिक लक्षणे असल्याने क्लिनिकल गाइडलाईनची गरज आहे. त्यामुळे केवळ हृदय आणि फुफ्फुसाच्या आरोग्याकडे लक्ष देऊन चालणार नाही.
- इंग्लंडमध्ये बहुतांश रूग्ण कोविडमधून बरे झाल्यानंतर फुप्फुस आणि त्यासंबंधी तपासण्यावर अधिक भर देत आहेत. कारण अनेकांना श्वासाशी निगडीत त्रासांना सामोरे जावे लागले आहे. परंतु त्यानंतर अन्य समस्या देखील वाढल्या असून त्याकडेही लक्ष देणे तितकेच महत्वाचे आहे.
- याशिवाय लाँग कोविडच्या लक्षणांकडे लक्ष देऊन त्यावर संपूर्णपणे उपचार करणे आवश्यक आहे.
- ऍथेना यांना कोविडमधून बरे झाल्याच्या 16 महिन्यानंतरही पूर्ण बरे झाल्याचे वाटत नाही. त्यामुळे लाखो लोकांना माझ्यासारखाच त्रास होत असेल, असे त्या म्हणतात.
- हे संशोधन यूनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या तज्ञांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. त्यात 5 देशातील 3762 जणांनी सहभाग घेतला. यात दीर्घकाळापर्यंत कोविडच्या लक्षणात थकवा येणे, व्यायामानंतर अशक्तपणा येणे, कमी ऐकू येणे यासारखे त्रास होत आहेत.
- याशिवाय त्वचा कोरडी पडणे, मासिक पाळीत बदल, सेक्सुअल डिफेंशन्शी, मूतखडय़ाचा त्रास, हृदयाचे ठोके, उच्च रक्तदाब, प्रजननसंबंधी समस्या, स्मरणशक्ती कमी होणे, दृष्टीत धूरकटपणा वाढणे, अतिसार यासारख्या लक्षणांचा समावेश आहे.