ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशमध्ये विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची आज सकाळी अज्ञातांनी गोळय़ा घालून निघृणपणे हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, रणजीत बच्चन हे गोरखपूरमध्ये राहतात. आज सकाळी ते मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. मॉर्निंग वॉकदरम्यान, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी त्यांच्या डोक्यात गोळय़ा झाडल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गोरखपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेवून तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बच्चन यांच्यावरील हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या घटनेमुळे उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजल्याचे दिसून येते. यापूर्वीही उत्तर प्रदेशात हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली होती.