लखनौ (उत्तर प्रदेश) / वृत्तसंस्था
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेतील लखनौस्थित नव्या प्रँचायझीचे सोमवारी लखनौ सुपर जायंट्स असे नामकरण केले गेले. लखनौ सुपर जायंट्सने 2022 आयपीएल आवृत्तीसाठी केएल राहुल (17 कोटी), मार्कस स्टोईनिस (9.2 कोटी), रवी बिश्नोई (4 कोटी रुपये) या खेळाडूंना करारबद्ध केले असून केएल राहुलकडे नेतृत्वाची धुरा असणार आहे. अँडी फ्लॉवर या संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. याशिवाय, माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीर या संघासाठी मेंटर म्हणून काम पाहणार आहे.