माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनमुळे लघु उद्योजकांना मोठा फटका बसला आहे. अशातच हेस्कॉम वतीने स्टंडिंग चार्ज भरण्याची सूचना करण्यात आली आहे. तर स्टँडिंग चार्जची रक्कम माफ करण्यात आली असल्याचे हेस्कॉमला कळविले आहे. मात्र यासाठी कर भरणा आणि उद्योग परवानाची सक्ती करण्यात आली होती. परंतु लॉकडाऊनमुळे हे अशक्मय असून अन्य अटी घालू नका अशी मागणी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर आणि समाजसेवक संदीप हुंदरे यांनी केली आहे. मंगळवारी त्यांनी हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करूर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
लॉकडाऊनमुळे अटी न घालता उद्योग आधारकार्ड असणाऱया लघु उद्योजकांचे दोन महिन्याचे स्टँडिंग चार्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी केली. विनोद करूर यांनी कोणत्याही अटी घालण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच रेल्वे स्टेशनसमोरील हेस्कॉमच्या कार्यालयात यासाठी विशेष काऊंटर सुरू करण्यात आले असून, याठिकाणी लघु उद्योजकांनी आपले विजबील, आधारकार्ड आणि उद्योग आधारकार्डाची झेरॉक्स प्रत आणून संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. गिरणी चालक, यंत्रमागधारक, लेथ मशीन धारक अशा प्रोडक्टिव्ह (उत्पादन) मशीनरी असणाऱया लघु उद्योजकांना ही सवलत राहणार आहे.