ऑनलाईन टीम / लेह :
लडाखमध्ये गुरुवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी 7 वाजून 39 मिनिटांनी हा भूकंप झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.
याआधी मंगळवारी देखील लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. याची तीव्रता 3.5 इतकी होती. हा भूकंप रात्री 10 वाजता झाला होता.