लाईव्ह व्हिडीओची नवीन सुविधा : व्हिडीओवर शुल्क आकारणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर लाईव्ह व्हिडीओ पाहण्यासाठी येत्या काळात आपल्याला पैसे द्यावे लागणार आहेत. फेसबुककडून लवकरच लाईव्ह व्हिडीओच्या सुविधेला शुल्क आकारण्यावर विचार होण्याची शक्मयता आहे. तसेच कोरोनाच्या संकटाच्या दरम्यान आर्ट्ससंबंधी रुची असणाऱया लोकांना या नवीन फिचरचा फायदा होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
जे लोक फेसबुकवरती लाईव्ह व्हिडीओ करत असतात, ते नवीन फिचरच्या मदतीने लाईव्ह ब्रॉडकास्टिंग सुरु करण्याच्या अगोदर आपला व्हिडिओ ऍक्सेस करण्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे. परंतु हे फिचर फेसबुक कधीपासून सुरु करणार यांची मर्यादा काय यासह अन्य प्रश्नासंदर्भात फेसबुककडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
विविध घटकांसाठी सोय
लॉकडाऊनच्या वाढत्या बंदमुळे संगीत, कॉमेडी, पर्सनल टेनर, वक्ते यासारख्या लोकांना आपली कला जोपासण्यावर मोठी बंधने येत आहेत. यामुळे फेसबुकही लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून लोकांशी जोडण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करणार आहे. या फिचरमुळे कोणत्याही ट्रस्टसाठी निधी उभारणे सोपे होणार असल्याचे फेसबुकने म्हटले आहे.
लहान व्यावसायिकांना लाभ
फेसबुक क्रिएटर्स आणि लहान व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाशी संबंधीत लाईव्ह व्हिडीओ शुल्क आकारणीचा पर्याय देण्यात येणार आहे. त्यामुळे या ऑनलाईन साधनांच्या आधारे जवळच्या आणि व्यावसारिक परिषदेसाठी वापर करता येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे याचा फायदा व्यावसायिकांना अधिक होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.