ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर नदीम अबरार याला बडगाम जिल्ह्यातील नरबळ येथून काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
सुरक्षा दलावरील हल्ल्यांमध्ये अबरारचा सक्रिय सहभाग होता. श्रीनगर-बारामुल्ला सीमेवरील अनेक हत्या आणि हल्ल्यांमध्ये तो सामील होता. त्याच्या अटकेची कारवाई आमच्यासाठी मोठे यश आहे, असेही विजय कुमार यांनी म्हटले आहे.