सावंतवाडी/ प्रतिनिधी-
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या लसीकरणात गोंधळ होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अध्यक्ष डाॅ.उत्तम पाटील यांच्यासह अन्य डॉक्टर कर्मचारी यांना धारेवर धरले. पहाटे रांगेत उभ्या राहणाऱ्या सर्वसामान्य माणसांना कुपन मिळत नाही परंतु राजकीय वसेलीबाजीवाल्यांना कुपन मिळते हे तात्काळ थांबवा,अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही अशा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी शहराध्यक्ष देवा टेमकर, महिला शहराध्यक्ष चित्रा देसाई, ओशोक पवार,शफीक खान, ऑगस्टीन डिसोजा, जावेद शेख, संतोष जोईल, इफतिका राजगुरू,आसिफ ख्वाजा, याकूब शेख आदी उपस्थित होते.
यावेळी सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, जिल्हा उपाध्यक्ष शफीक खान ,व्ही.जे.एन.टी. जिल्हाध्यक्ष अशोक पवार, व्यापार विभाग कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान ,उद्योग व व्यापार विभाग महिला जिल्हाध्यक्षा सौ दर्शना बाबर देसाई, युवती तालुकाध्यक्ष जहिरा ख्वाजा ,अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, युवक तालुकाध्यक्ष राजू धारपवार ,शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख, जिल्हा कार्यकारणी सदस्य ऑगस्तीन फर्नांडिस ,संतोष जोईल, नियाज शेख,याकुब शेख, आसिफ ख्वाजा ,आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.