कोरोना प्रतिबंधक लसीचे 2 डोस घेतल्यानंतर लोक सुरक्षित राहतील, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात 2 कर्मचारी बाधित झाल्याने मोठाच प्रश्न उभा राहिला आह़े रोगप्रतिकारक शक्ती तयार होण्यापूर्वीच या दोघांना संसर्ग झाला असण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱयांनी व्यक्त केल़ी
जागतिक स्तरावर सध्या सार्वजनिक आरोग्याचा विषय खूप महत्त्वाचा ठरला आह़े कोरोनाचा प्रसार सगळ्यांना त्रासदायक ठरला आह़े या रोगाच्या प्रतिबंधासाठी लसीकरणाचा उपाय शोधून काढण्यात आला आह़े या उपायामुळे लोक कोरोनापासून दूर राहतील अशी अपेक्षा आह़े लस आली आणि कोरोनाचे संकट आल़े अशी परिस्थिती †िदसत नसून खुद्द लसीकरण हेच मोठे आव्हान ठरत आह़े लसीकरण अभियान पार पाडताना देखील अडचणींवर मात करावी लागत आह़े
रत्नागिरी जिह्यातल्या मंडणगड तालुक्यातील आरोग्य विभागाच्या 319 कर्मचाऱयांनी कोरोना प्रतिबंधाची पहिली लस देण्यात आली. यापैकी 197 कर्मचाऱयांना कोरोना प्रतिबंधाची दुसरी लस देण्यात आली आहे. 240 शासकीय कर्मचाऱयांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेतील पहिले लसीकरण करण्यात आले. यातील 86 जणांना दुसरे लसीकरणही करण्यात आले आहे. या तालुक्यातील एका अंगणवाडी सेविकेसह डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली आह़े दोघांनाही लसीची दुसरी मात्रा देण्यात आली होत़ी तथापि, त्यांना बाधा झाल्यामुळे प्रश्न निर्माण झाला आह़े कोरोना प्रतिबंधक लसीचे 2 डोस घेतल्यानंतर लोक सुरक्षित राहतील, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात 2 कर्मचारी बाधित झाल्याने मोठाच प्रश्न उभा राहिला आह़े कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 10 ते 28 दिवसात रोगप्रतिकारक शक्ती तयार होत असत़े अशी शक्ती तयार होण्यापूर्वीच या दोघांना रोगाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱयांनी व्यक्त केल़ी
सामान्य लोक लसीच्या संदर्भात मोठी आशा लावून बसले आहेत़ एकदा का पुरेशी लस आली की लोक लसीकरण मोहिमेत सहभागी होतील आणि कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रतिबंधात्मक शक्तीसह उभे राहतील अशी भावना व्यक्त होत आह़े विविध ठिकाणांच्या बातम्यांवरून कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे मानले गेले आह़े तथापि, मंडणगडमध्ये पुढे आलेल्या प्रकारामुळे लोकांच्या मनात लसीकरण मोहिमेविषयी प्रश्न निर्माण झाला आह़े एखाद्या व्यक्तीला लसीचे दोन डोस मिळाल्यानंतरदेखील कोरोनाची बाधा होण्याची शक्यता शिल्लक राहते काय? लस घेणाऱया प्रत्येकाला संरक्षक कवच उपलब्ध झाले म्हणता येईल काय असे कित्येक प्रश्न लोक विचारत आहेत़ निवडक ठिकाणी खासगी रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू आह़े लोकांनी 250 रु. भरून स्वेच्छापूर्वक कोरोना लस घ्यावी, असे अपेक्षित आह़े खासगी केद्रांवर लस घेतलेल्या लोकांच्या मनातदेखील मंडणगड प्रकरणामुळे प्रश्न निर्माण झाला आह़े पैसे मोजून लस घेण्यात आली आह़े परंतु कोरोना संसर्गाचा धोका शिल्लक राहिल काय असा प्रश्न निर्माण झाला आह़े
रत्नागिरी जिह्यात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 10,250 पर्यंत जाऊन पोहोचली आह़े त्यातील 94.65… रुग्ण बरे झाल़े मृत्यूदर 3.61… एवढा राहिला आह़े राष्ट्रीय व राज्याच्या मृत्यू दरापेक्षा त्याचे प्रमाण बरेच जास्त आह़े तो कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी वर्षभरात त्यावर धडक उपाय दिसून आलेला नाह़ी सिंधुदुर्गात आजवर 6,616 लोकांना कोरोनाची बाधा झाली आह़े रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 94… आह़े एकूण मृत्यूदर 2.1… आह़े ऍक्टिव्ह रुग्ण 172 आहेत़ कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जादा चाचण्या करण्याविषयी निर्णय झाला आह़े त्यासाठी 16 लाखाची यंत्रणा विकत घेण्याकरिता निधी मंजूर झाला आह़े लवकरच आरटीपीसीआरची आणखी नवी यंत्रणा सिंधुदुर्गात बसवण्यात येणार आह़े कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचे राज्य सरकारचे आरोग्य मंत्रालय म्हणत आह़े राज्य सरकारने अंशतः निर्बंध पुन्हा लागू केले आहेत़ कार्यालयांमधील कर्मचाऱयांची उपस्थिती 50 टक्क्याने कमी करण्यात आली आह़े यामुळे लोकांची गर्दी कमी होईल़ त्यातून कोरोना प्रसाराला अटकाव होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात शिमगोत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जात़ो उत्सव साजरा करताना निर्बंधांची आखणी जिल्हा प्रशासनाने केली होत़ी या निर्बंधामुळे नेहमीसारखा उत्सव साजरा करणे अशक्य बनले होत़े उत्सवासाठी उत्साही असणाऱया लोकांनी प्रशासकीय निर्णयांच्या विरोधात राजकीय नेतृत्वाकडे आशेने पाहिल़े निर्बंध शिथिल करा म्हणून रत्नागिरी जिह्यात विनंती करण्यात आली आणि लोकशाहीत लोकांच्या मताला खूपच किंमत असल्याने प्रशासनाने घातलेले निर्बंध राजकीय नेतृत्वाच्या सूचनांमुळे कमी करण्यात
आल़े
एका बाजूला वाढीव निर्बंधांचे मुद्दे राज्य सरकारकडून पुढे करण्यात येत आहेत़ त्याचवेळी प्रशासनाने घातलेले निर्बंध कमी होत आहेत़ एकाच वेळेला दोन प्रकारची धोरणे राबवली जात असल्याने लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आह़े कोरोना नियंत्रणात येण्यापूर्वी परंपरा, उत्सव साजरे करण्याविषयी लोकांनी संयम ठेवला पाहिज़े कोरोनाचा प्रसार हा मानवी जीवनातील विविध क्षेत्रातल्या जोखमेंचे मुद्दे वाढवत असत़ो यासाठी शिमगा असो वा अन्य कोणताही उत्सव तो साजरा करताना अजून काही काळ तरी संयम हवाच़
सुकांत चक्रदेव