ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात 1 मे पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी नावनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यासाठी 28 एप्रिलपासून नावनोंदणी सुरू होणार आहे. आरोग्य मंत्रालयाने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी 28 एप्रिलपासून नोंदणी सुरू होत आहे. COWIN.GOV.IN या अधिकृत वेबसाईटवरून ही नोंदणी करावी, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.