7 वर्षीय एलिझाबेथने तयार केलेला स्टिकर चंद्रावर चमकणार
एस्ट्रो लिज लॅब टाईम कॅप्सूलमध्ये ठेवला जाणार स्टिकर, 7 वर्षीय उदयोन्मुख अंतराळवीर एलिझाबेथ नॉर्मनने तयार केलेली सामग्री चंद्रावर जाणार आहे. असा मान मिळविणारी ती पहिलीच मुलगी ठरली आहे. एलिझाबेथचा स्टिकर ‘एस्ट्रो लिज लॅब’ 1972 मध्ये चंद्रावर नेण्यात आलेल्या टाइम कॅप्सूलमध्ये ठेवण्यात येणार आहे.
मार्स रोव्हरच्या लँडिंगनंतर नॉर्मनने अंतराळ शास्त्रावर स्वतःचे लक्ष केंद्रीत केले. याचवर्षी तिने तिचा रॉकेट सादर केला, ज्याचे नाव ‘वल्केन सेंचोर’ आहे. हे 7 फूटांचे कार्डबोर्ड मॉडेल असून जे अमेरिकेन स्पेसक्राफ्ट लाँच सर्व्हिस प्रोव्हायडर, युनायटेड लाँच एलियन्सकडून विकसित केले होते अशी माहिती तिच्या आईने दिली आहे.
नॉर्मन स्वतःचे सोशल मीडिया चॅनेल ‘एस्ट्रो लिज लॅब’च्या माध्यमातून विज्ञानाशी संबंधित प्रयोग पोस्ट करते. अलिकडेच तिने नासाकडून संचालित 5 आठवडय़ांचा कार्यक्रम ‘व्हर्च्युअल मिशन टू मार्स’ पूर्ण केल आहे. नॉर्मन तरुणाईसाठी रोल मॉडेल ठरणार आहे. अंतराळासाठी एलिझाबेथने केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. या मुलीच्या स्टिकरला चंद्रावर पाठवताना गर्व वाटत असल्याचे उद्गार कंपनीने काढले आहेत.