गुलाबाच्या रोपामुळे घरातल्या बागेला चार चांद लागतात. घरी गुलाबाचं रोप लावण्याच्या या काही टिप्स…गुलाबाच्या रोपाची निवड सर्वात महत्त्वाची आहे. सर्वच प्रकारचे आणि रंगांचे गुलाब आकर्षक दिसत असले तरी प्रत्येक गुलाब कुंडीत वाढत नाही. त्यामुळे तुमच्या शहरातल्या वातावरणात वाढणार्या गुलाबाच्या प्रजातीची निवड करा.
- गुलाबाच्या रोपाला किमान सहा तास सूर्यप्रकाश मिळायला हवा. यामुळे रोपटं लावण्यासाठी हवेशीर आणि भरपूर प्रकाश असणारी जागा शोधा.
- गुलाबाचं रोपटं लावल्यानंतर त्याची काळजी घेणं हे खूप मोठं आव्हान असतं. गुलाबाला नियमित पाणी घालणं आवश्यक आहे.
- गुलाबाच्या रोपाला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत पाणी घालू नका. या काळात सूर्यप्रकाश तीव्र असल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होऊन जातं.
- गुलाबाला पाणी घालताना विशेष काळजी घ्यायला हवी. या रोपटय़ाला रोग लवकर लागतात. त्यामुळे किटकनाशकांची फवारणी आवश्यक आहे. तसंच पाणी पानांना लागू देऊ नका.
- रोपटय़ाला नियमित खत घालत रहा. अर्थात खताचं प्रमाणही मर्यादित असायला हवं. जास्त खतामुळेही रोपटय़ाची वाढ खुंटू शकते. त्यामुळे खताचं प्रमाण नीट ठरवून घ्या.