पश्चिम आशियामधील कंत्राटांचा राहणार समावेश
नवी दिल्ली
बांधकाम क्षेत्रातील प्रमुख लार्सन अॅण्ड टुब्रो (एल अॅण्ड टी) या कंपनीला पश्चिम आशियातील प्रदेशात जवळपास 7,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या किंमतीची कंत्राटे मिळाली आहेत. कंपनीने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे, की मिळालेल्या करारांमध्ये अभियांत्रिकी, बांधकाम आणि विविध नवीन ऑफशोअर सुविधांची सोय करणे व इतर कामांचा यात समावेश आहे.