नवी दिल्ली : मोबाइल क्षेत्रात कार्यरत असणारी लावा इंटरनॅशनल कंपनी येत्या काळात 1400 ते 1500 कोटी रुपये उभारण्याच्या विचारात आहे. सदरची रक्कम भारतीय भांडवली बाजारात आयपीओ आणून उभारली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सदरचा आयपीओ आणण्याबाबत रीतसर अर्ज संबंधीतांकडे याच महिन्यात सादर करण्यात येणार आहे. ताजे समभाग व ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून रक्कम जमवण्याचा प्रयत्न कंपनीचा असणार आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये कंपनीला 107 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे तर महसूल 5 हजार 269 कोटी रुपये इतका प्राप्त झाला आहे.
Previous Articleशांतता असली तरीही सतर्कता अत्यावश्यक
Next Article सईच्या डान्सला लाइक्सची फोडणी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.