वार्ताहर/ खानापूर
खानापूर तालुक्मयातील लिंगनमठ येथील कर्नाटक विकास बँकेवर मागील वषी 28 ऑक्टोबरला धाडशी दरोडा टाकून जवळपास 15 लाखांवर डल्ला मारला होता. या बँक लूट प्रकरणाला वर्ष पूर्ण झाले. पण, चोरीचा तपास अद्याप शून्यच आहे. आजवर पोलिसांना कोणतेच धागेदोरे मिळाले नाहीत. त्यामुळे वाढत्या घरफोडी तसेच मोठय़ा चोरी प्रकाराबद्दल पोलीस यंत्रणाही हतबल झाली आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांतून व्यक्त केला जात आहे.
खानापूर तालुक्मयात चोरीची प्रकरणे तशी नवीन नाहीत. सध्य परिस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर अशा प्रकाराला बराच लगाम बसला असला तरी वारंवार होणाऱया घरफोडय़ा, वाहन चोरी, दागिने लंपास करणे असे अनेक प्रकार घडत आले आहेत. अशा प्रकाराचा पोलीस प्रशासनाने बऱयाच वेळा तपासही लावला आहे. पण बँकेसारख्या ठिकाणी झालेल्या दरोडा प्रकरणाचा तपास करण्यास पोलीस यंत्रणा मात्र मागे राहिली आहे. 25 जुलै 2016 रोजीही बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये अशाच प्रकारची लूट झाली होती. त्या चोरी प्रकरणाचा आजवर छडा लागला नाही. त्यामुळे चोरी प्रकरणांचा तपास करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
चोरीमध्ये साम्य
खानापूर तालुक्मयात घरफोडय़ा किंवा लहान-मोठय़ा चोरी प्रकरणांमध्ये अनेकवेळा संशयितांना ताब्यात घेऊन बंदिस्तही केले आहे. परंतु नियोजनबद्धरीत्या बँक लुटीचा हा प्रकार घडल्याने चिंतेची बाब बनली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये 2016 साली झालेला चोरीचा प्रकार व लिंगनमठ-कर्नाटक विकास बँकेमध्ये 2019 मध्ये झालेला चोरीचा प्रकार यामध्ये साम्य दिसून आले आहे.
लिंगनमठ येथील कर्नाटक ग्रामीण विकास (केव्हीजी) बँकेची पाठीमागील खिडकी तोडून लॉकर गॅस कटरने निकामी करून 70048 रोकडसह 50 तोळय़ाचे 15 लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवार दि. 28 आक्टोबर 2019 रोजी रात्री घडली होती. बँकेवरील या धाडशी दरोडय़ामुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. ऐन दिवाळीच्या सणात झालेल्या या दरोडय़ामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांसमोर मोठे आव्हान
बँकेवर झालेल्या दरोडाप्रकरणी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभारले आहे. डीवायएसपी प्रदीप घंटी यांच्यासह बैलहोंगल विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ, खानापूरचे पोलीस उपनिरीक्षक बसगौडा पाटील, नंदगड पोलीस स्थानकाच्या तत्कालीन उपनिरीक्षिका सुमा नायक तसेच हवालदारसह पोलिसांच्या पथकाने बँक परिसरात पाहणी करून काही पुरावे हस्तगत केले होते. पण वर्ष उलटले तरी आजवर या प्रकरणाचा सुगावा लागला नाही. अशाच प्रकारे 2016 मध्ये खानापुरातील स्टेशन रोडवरील भरवस्तीत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये दरोडा पडला होता. या दरोडय़ात जवळपास 14 लाखाहून अधिक रुपयांची रोकड भामटय़ांनी लांबविली होती. या घटनेचा आजवर पोलिसांना छडा लागला नाही. या बँकेतील दरोडाही पाठीमागील खिडकी तोडून गॅस कटरच्या साहाय्याने लॉकर निकामी करून रोकड लंपास करण्यात आली होती. या दरोडय़ाचाही आजवर छडा लागला नाही. लिंगनमठ येथील कर्नाटक विकास बँकेच्या शाखेवर पडलेला दरोडा पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले. पोलीस खाते खरोखरच या प्रकरणाबाबत गांभीर्य घेतेय क़ा? असा सवाल सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे.