मुंबई
औषध क्षेत्रातील कंपनी लुपीनच्या समभागांचे भाव सोमवारी 6 टक्के इतके घसरलेले पाहायला मिळाले. कंपनीच्या समभागाच्या भावात दोन दिवसात 9 टक्के इतकी घसरण नोंदवली गेली आहे. कंपनीने डिसेंबरला संपलेल्या तिसऱया तिमाहीअखेर नफ्यामध्ये घट नोंदवली होती, ज्याचा परिणाम समभागाच्या भावावर दिसला. सोमवारी समभागाचा भाव 816 रुपयांवर घसरला होता.