प्रतिनिधी / बेळगाव
टिळकवाडी, रॉय रोड येथील सुभाषचंद्र लेले मैदानाशेजारी विद्युत खांब धोकादायक स्थितीत असून महानगरपालिकेला वारंवार कळवून सुद्धा त्या खांबाची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सदर खांब रस्त्याशेजारी एका बिल्डिंगसमोर आहे. गेले सहा महिने हा विद्युत खांब बिल्डिंगच्या बाजूला वाकला आहे. त्यामुळे येथे धोका निर्माण झाला आहे. येथील नागरिकांनी केईबी व महानगरपालिकेकडे त्याबद्दल वारंवार तक्रार केली आहे. तरी देखील केईबी व महानगरपालिकेने त्या खांबाकडे दुर्लक्ष केले आहे. सदर खांब धोक्मयाच्या स्थितीत असून बिल्डिंगवर खांब पडून नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार ? याबाबत चर्चा होत आहे. हा खांब लवकरात लवकर हटवून नवीन खांब बसवावा, अशी मागणीही येथील नागरिकांतून होत आहे.