ऑनलाईन टीम / बेंगळूर :
देशात लॉकडाऊनचे आदेश असताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या मुलाचे लग्न आज थाटामाटात पार पडले. या लग्नसोहळ्याला अनेकांची उपस्थिती होती.
रामनगर जिल्ह्यातील एका फार्म हाऊसवर कुमारस्वामींचा मुलगा निखिल याचा व्हीव्हीआयपी लग्न सोहळा पार पडला. काँग्रेेेसचे वरीष्ठ नेेते एम कृष्णाप्पा यांच्या मुलीसोबत निखिलचे लग्न झाले. 10 फेब्रुवारीला या दोघांचाही साखरपुडा झाला होता.
लग्नाविषयी बोलताना कुमारस्वामी म्हणाले, लग्नासाठी राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे कुटुंबातील काही सदस्यांच्या उपस्थितीतच रामनगरमधील फार्म हाऊसमध्ये हे लग्न करण्यात आले. निखिलचे लग्न हे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
कर्नाटक सरकार या लग्नाचे चित्रीकरण करणार असून, जर कोणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.