ऑनलाईन टीम / रांची :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. लॉक डाऊन मुळे सर्व व्यवहार बंद आहेत. तसेच क्रीडा क्षेत्रातील सर्व स्पर्धा, प्रशिक्षण केंद्र देखील बंद आहेत. मात्र, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि आर अश्विन यांच्या अकॅडमी द्वारे प्रशिक्षण दिले जात आहे.
महेंद्रसिंग धोनी आणि आर अश्विन हे आपल्या अकॅडमी द्वारे खेळाडूंना ऑनलाईन प्रशिक्षण देत आहेत. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून अश्विन खेळाडूंना स्वतः प्रशिक्षण देत आहे. तर धोनी आपल्या प्रशिक्षित शिक्षकांनी द्वारे शिकवत आहे.
धोनीच्या अकॅडमीचे मुख्य कोच सतरा ज्योती लाहिरी यांनी सांगितले की, आम्ही फेसबुकच्या माध्यमातून खेळाडूंसाठी ऑनलाइन कोचिंग व्हिडिओ टाकत होता. या व्हिडिओंना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच या व्हिडिओ आत्तापर्यंत दहा हजार पेक्षा अधिक लोकांनी पहिले आहेत.
तसेच आमचे एक ‘क्रिकेटर’ नावाचे ॲप आहे. या द्वारे खेळाडूंना डेमो ड्रिल देखील दाखवण्यात येत आहे. तसेच खेळाडूंना देखील आपल्या प्रॅक्टिस चा व्हिडीओ टाकणे आवश्यक आहे. त्याद्वारे त्यांच्या प्रॅक्टिस वर लक्ष ठेवणे सोपे जात आहे. असं ही ते यावेळी म्हणाले.