प्रतिनिधी /बेळगाव
लोककल्प फौंडेशन व नंदादीप नेत्र रुग्णालय-बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रतपासणी करण्यात आली. खानापूर तालुक्मयातील बैलूर गावात हे शिबिर झाले. लोककल्प फौंडेशन जीवनमान सुधारण्यासाठी काम करण्यास कटिबद्ध आहे. या गावातील लोक विशेषतः आरोग्य आणि स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि शिक्षण या क्षेत्रातील आहेत. बेळगाव येथील नंदादीप नेत्र रुग्णालयाच्या नेत्र चिकित्सालयातील कर्मचाऱयांनी तपासणी केली.
लोककल्प फौंडेशनने दत्तक घेतलेल्या 32 गावांपैकी बैलूर आहे. नंदादीप नेत्ररुग्णालय कर्मचाऱयांनी ग्रामस्थांची डोळे आणि मोतीबिंदूची तपासणी केली. येत्या काही दिवसांत डोळय़ांची समस्या असलेल्यांना लोककल्प फौंडेशनतर्फे मोफत चष्मे दिले जातील. शिबिरात ग्रामपंचायत अध्यक्षा अनुसया बामणे व उपाध्यक्ष रवींद्र गुरव, लोककल्पचे स्वयंसेवक आणि कर्मचारी उपस्थित होते.