प्रतिनिधी /मडगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीची मडगाव शाखा काल सोमवार दि. 28 जून पासून नव्या वास्तूत स्थलांतरीत करण्यात आली आहे. ही नवीन वास्तू मडगाव पोलीस स्थानकाच्या मागे पोलिंना बिल्डिंग, पॉप्युलर हायस्कूलजवळ, कोंब-मडगाव येथे कार्यान्वित झाली आहे. अतिशय साध्या पद्धतीने काल स्थलांतरणाचा कार्यक्रम झाला.
लोकमान्य सोसायटीची मडगाव शाखा सर्व आधुनिक सोयीनी सुसज्ज असून या शाखेत सुरक्षित लॉकर सुविधा उपलब्ध आहे. वीज बिल भरणा, टेलिफोन बिल भरणा, एलआयसी विमा, आरोग्य विमा व इतर विमा सेवा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी मडगाव शाखा ही महत्वाची शाखा असल्याने भविष्यात सोने तारण कर्ज सुविधा व परकीय चलन देवाण-घेवाण सेवा व इतर महत्वाच्या सेवा उपलब्ध केल्या जाणार आहेत.