वार्ताहर/ काकोडा
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कुडचडे शाखेचे वरि÷ व्यवस्थापक तुळशीदास हरिश्चंद्र बांदेकर (वय 63 वर्षे) यांचे शनिवारी सकाळी अल्पआजाराने निधन झाले. त्यांच्यावर मडगावच्या खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. त्याचदिवशी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पंटेमळ-कुडचडे येथील रहिवासी असलेले बांदेकर हे मागील सुमारे 17 वर्षे लोकमान्य पतसंस्थेच्या सेवेत होते. गोवा राज्यातील दुसऱया कुडचडे शाखेत सुरुवातीपासून ते सेवेत होते. मध्यंतरी त्यांनी ‘लोकमान्य’च्या केपे शाखेतही व्यवस्थापक म्हणून काम केले होते. कुडचडे, सावर्डे, सांगे व केपे भागांतील ग्राहकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यांच्यापश्चात पत्नी वृक्षा (म्हापसा अर्बन बँकेच्या कर्मचारी) व पुत्र सर्वज्ञ असा परिवार आहे.