प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य टेनिंग ऍकॅडमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून लष्कर तसेच निमलष्करी दलात भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच पार पडला. लोकमान्य टेनिंग ऍकॅडमी उत्तर कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र व गोव्यामधील एक अग्रगण्य टेनिंग ऍकॅडमी म्हणून ओळखली जाते. आजवर या ऍकॅडमीतून प्रशिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी लष्कर तसेच निमलष्कर सेवेत दाखल झाले आहेत.
वैभव पाटील (आसाम रायफल्स), महेश गुंजीकर (सीआरपीएफ कोब्रा कमांडो), प्रदीप शेरखान (बीएसएफ), साईनाथ कुंडेकर (लष्कर) या विद्यार्थ्यांचा लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे संचालक अजित गरगट्टी, सीएसओ कर्नल दीपक गुरुंग यांच्या हस्ते सन्मान करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यशस्वी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टेनिंग ऍकॅडमीतील प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. यावेळी ऍकॅडमीचे व्यवस्थापक रणजीत उचगावकर, टेनिंग इनचार्ज विनायक कोकितकर, शिक्षिका निकिता बेळगावकर यांच्यासह इतर उपस्थित होते. ज्या मुला-मुलींना सैन्य दलात तसेच अर्धसैन्य दलात भरती होण्यासाठी प्रशिक्षण घ्यावयाचे आहे, त्यांनी लोकमान्य टेनिंग ऍकॅडमी, राणी चन्नम्मानगर, दुसरे स्टेज (वेदमंदिर) येथे भेट द्यावी. अधिक माहितीसाठी 0831-2420120 किंवा 7022469543 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन लोकमान्य टेनिंग ऍकॅडमीतर्फे करण्यात आले आहे.