ग्राहक व कलाकारांचा सन्मान
प्रतिनिधी / फोंडा
लोकमान्य मल्टिपर्पज कॉ-ऑप सोसायटीच्या वरचा बाजार फोंडा शाखेत नुकताच ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी सोसायटीच्या ग्राहक व सामाजिक कार्यात बहुमुल्य योगदान दिलेल्या नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
मेळाव्याला प्रमुख पाहूणे म्हणून फोंडा पालीकेचे नगरसेवक रितेश नाईक, आनंद नाईक, लोकमान्य मुख्य व्यवस्थापक कुमार प्रियोळकर, सहाय्यक व्यवस्थापफक अन्थोनी आझावेदो, प्रणाली काणेकर, सदर फोंडा शाखेचे व्यवस्थापक पुरूषोत्तम तळावलीकर, वरचा बाजार फेंडा शाखेच्या व्यवस्थापक जान्हवी पाटकर, ऍड. संतोष रामनाथकर, गोविंद काळे उपस्थित हेते. यावेळी बोलताना रितेश नाईक म्हणाले की लोकमान्य सोसायटीने आजपर्यंत विश्वासहर्ता सांभाळून आर्थिक व्यवहार केलेला आहे. पंचवीसाव्या वर्षात सोसायटीतर्फे ग्राहकांना आकर्षित करणाऱया सुलभ व आर्थिक गुंतवणूकीसाठी नवनवीन योजना जाहीर केलेल्या आहेत त्य़ाचा फोंडयातील ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
ग्राहक मेळाव्यात ज्येष्ठ कलाकार तथा निवृत्त शिक्षक गिरिष वेळगेकर, कलाकार भजनी कलाकार सुरेद्र बोरकर, हामोर्नियम वादक संदीप सांगावकर व ऍड. संतोष रामनाथकर यांचा प्रमुख पाहुण्य़ाच्याहस्ते सन्मान करण्यात आला. त्याशिवाय बहुमुल्य ग्राहक म्हणून गुरूनाथ टेंगसे, रविंद्र येडवी, श्रीकांत कामत, प्रकाश रायकर यांचा सन्मान करण्यात आला. ग्राहक मेळाव्याचे उद्घाटन शाखेबाहेर उभारण्यात आलेल्या ग्राहक मंचच्या मंडपात प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले. त्यानंतर औपचारिक सोहळा पार पडला.
लोकमान्यच्या गोव्यात 50 तर देशभरात एकूण 217 शाखा
लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या गोव्यात एकूण 50 शाखा आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व दिल्ली येथे जाळे विस्तारलेले असून एकूण 217 शाखा आहेत. लोकमान्य सोसायटीने बॅकिंग क्षेत्रासह आरोग्य, वाहन विमा योजनाही आपल्या ग्राहकांना देण्याकडे भर दिलेला आहे. आजच्या घडीला लोकमान्यच्या आनंदी जीवन, धनलाभ व आरडीच्या रूपात उत्कर्ष यासारख्या योजनाकडे ग्राहकांचा कल असल्याचे शाखा व्यवस्थापक तळावलीकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार पुरूषोत्तम तळावलीकर यांनी केले.