प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या मच्छे गावातील शाखेचे नव्या जागेत स्थलांतर करण्यात आले. मुख्य बसस्टॉप, खानापूर रोड येथील नव्या इमारतीत शाखा स्थलांतर करण्यात आली. लोकमान्य सोसायटीचे संस्थापक व तरुण भारतचे समूहप्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी हा कार्यक्रम पार पडला.
5 वर्षांपूर्वी 31 मार्च 2015 ला वाघवडे रोड, मच्छे येथे शाखा सुरू करण्यात आली होती. ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच सोसायटीने मोठी भरारी घेतली. ग्राहकाभिमुख सेवा, पारदर्शक व्यवहार यामुळे अल्पावधीत शाखेची उलाढाल वाढली. त्यामुळे आता खानापूर रोडवरील नव्या इमारतीत या शाखेचे स्थलांतर करण्यात आले.
संस्थापक किरण ठाकुर यांनी शाखेच्या स्थलांतरणानिमित्त शुभेच्छा दिल्या. ग्राहकांशी संवाद साधून अजून चांगल्या सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच सध्या आरोग्याच्या समस्या वाढल्या असून प्रत्येकाने विमा करून येणाऱया खर्चाच्या चिंतेतून मुक्त व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
ज्ये÷ ग्राहक कृष्णा बेळगावकर यांचा सत्कार
वयाची शंभरी पार केलेले व सोसायटीचे ज्ये÷ ग्राहक कृष्णा बेळगावकर यांचा यावेळी किरण ठाकुर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. आजही या वयात ते सायकलवरून फिरतात, याबद्दल त्यांचे ठाकुर यांनी कौतुक केले. विराज इम्पायर इमारतीचे मालक डॉ. पद्मराज प्रकाश पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी संचालक सेवंतीभाई शाह, प्रभाकर पाटकर, अजित गरगट्टी, अनिल चौधरी, सुबोध गावडे, गजानन धामणेकर, समन्वयक विनायक जाधव, रिजनल मॅनेजर मधुकर कुलकर्णी, असिस्टंट रिजनल मॅनेजर सी. आर. पाटील, मार्केटिंग मॅनेजर गुरुप्रसाद तंगणकर, ऍडमिन मॅनेजर किसन लाड, कायदा सल्लागार विश्वनाथ जोशी, शाखा व्यवस्थापक संजय पाखरे, साहाय्यक शाखा व्यवस्थापक परेश शिरोडकर, भारती टोणे, ज्योती मोरे, सुधीर कालकुंद्रीकर, नागेश तांबे यांच्यासह कर्मचारी, ग्राहक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.