प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या स्थापनेला 26 वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या 26 वर्षांत ग्राहकांना उत्कृष्ट सेवा व सर्वाधिक व्याज परतावा देऊन लोकमान्य सोसायटी लोकप्रिय झाली आहे. एका छोटय़ा कार्यालयातून 1995 साली सुरू झालेली संस्था एक विश्वासू आणि आपुलकीची संस्था म्हणून सर्वसामान्य जनात लोकमान्यता प्राप्त करून राहिली आहे. सुरक्षितता, विश्वासार्हता, व्यावसायिकता व पारदर्शकता या चतुःसूत्रीवर संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू असून 213 शाखांचे विस्तीर्ण जाळे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे पसरले आहे. 26 व्या स्थापना दिनाचे वैशिष्टय़ म्हणून लोकमान्य सोसायटीने ‘लोकमान्य स्थापना दिन विशेष योजना’ सभासदांसाठी व ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू केली आहे.
स्थापना दिन विशेष योजना फक्त 26 महिन्यांच्या गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देईल. या योजनेत सहभागी होण्यासाठी किमान गुंतवणूक रु. 21,250 व त्या पटीत करायची आहे. या योजनेत काही अटींवर सभासदांच्या लहान मुला-मुलींनाही सहभागी होता येईल. ही योजना फक्त 1 सप्टेंबर 2021 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीतच कार्यान्वित राहील. ही योजना कमी काळात आकर्षक परतावा देणारी आहे. काही अटींवर व नियमांवर या योजनेत ठेव गुंतवणुकीवर 90 टक्केपर्यंत सुलभ कर्ज सुविधाही उपलब्ध आहे. मुदतपूर्व ठेव काढण्याची सोयही आहे.
या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या नजीकच्या शाखेत किंवा टोल फ्री नंबर 18002124050 वर संपर्क साधावा.