वंडर वुमन या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वल वंडर वुमन 1984 हा चित्रपट टाळेबंदीनंतर प्रदर्शित होणार आहेत. या सिक्वलमध्ये दोन नव्या शत्रूंशी तिचा सामना होणार आहे. प्रसारमाध्यम उद्योगपती मॅक्सवेल लॉर्ड आणि सुरुवातीला मित्र असलेली आणि आता शत्रू झालेली बार्बरा ऍन मिनर्व्हा उर्फ चिताह यांच्यासोबत तिची लढाई असणार आहे. याशिवाय ती आपल्या प्रियकरालाही म्हणजेच स्टीव्ह ट्रेव्हॉरला भेटणार आहे. गल गॅडोट या चित्रपटात वंडर वुमनच्या प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय ख्रिस पाईन, क्रिस्टन विग, पेड्रो पास्कल, रॉबिन राईट, कॉनी नेल्सन यांच्याही भूमिका या चित्रपटात आहेत. पॅटी जेंकिन्स यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर जिओफ जॉन्स, डेव्हिड पॅलाहॅम यांनी पटकथा लिहिली आहे.
संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई