प्रतिनिधी/ पणजी
कुजिरा बांबोळी येथील डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालयच पालक-शिक्षक संघातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन संपूर्ण वंदेमातरम गायन स्पर्धेत मुलींच्या गटात एल. डी. सामंत मेमोरियल हायस्कूलच्या सौरा मंगेश काळे हिला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.
न्यू एज्युकेशन इन्स्टिटय़ूट विद्यालय कुडचडे ची नव्या भट हिला द्वितीय, मुष्ठीफंड विद्यालय कुजीराची उर्वी वंसकर हिला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. श्रीजा कामत (इन्फट जिजस) व निधी शिंक्रे (आल्मेदा हायस्कूल) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे.
मुलांच्या गटात निलय प्रभू वेंगुर्लेकर (सर्वोदय एज्युकेशन सोसायटी) प्रथम तर संचित मणेरीकर (एल. डी. सामंत हायस्कूल) द्वितीय तर अथर्व शिरोडकर (गणेश विद्यामंदीर म्हापसा) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
कुटुंब गटात दत्ता नाईक आणि कुटुंबिय बेतकी फोंडा (प्रथम), विमल परेश नाईक आणि परिवार देसाईनगर मधलामाज मांद्रे (द्वितीय) तर नंदिनी च्यारी आणि कुटुंबिय पणजी (तृतीय) पारितोषिक प्राप्त झाले आहे.
7 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वा. हेडगेवार विद्यालयाच्या सभागृहात पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.