प्रतिनिधी / बेंगळूर
वकिलांना जीवन विमा, आरोग्य विमा सुविधा पुरविण्याची सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली आहे. दिल्लीमध्ये वकिलांना ज्याप्रमाणे विमा सुविधा पुरविण्यात आली आहे, तशी सुविधा कर्नाटकातही पुरविण्यात यावी, अशी सूचना सरकारला देण्यात आली आहे.
राज्यातही कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱया वकिलांना विमा सुविधा पुरविण्याची सूचना राज्य आणि केंद्र सरकारला द्यावी, अशी याचिका बेंगळूर वकील संघटनेचे अध्यक्ष एम. पी. रंगनाथ यांनी केली आहे. त्यांनी मागील वर्षी मार्चमध्ये उच्च न्यायालया जनहित याचिका दाखल केली होती.
मुख्य न्यायाधीश अभय ओक यांच्या नेतृत्वाखालील विभागीय पीठाने या याचिकेवर सुनावणी केली असून राज्य सरकारला सूचना दिली आहे. वकील संघटना, वकील परिषदेचे पदाधिकारी, विमा कंपन्यांशी चर्चा करून योजना तयार करून न्यायालयासमोर सादर करण्याची सूचना न्यायालयाने राज्य सरकारला दिली आहे. 17 मार्चपर्यंत या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर टाकण्यात आली आहे.