प्रतिनिधी/ बेळगाव
बाजार गल्ली, वडगाव येथील गणेश मंदिरमध्ये कार्तिकी संकष्ट चतुर्थीनिमित्त शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गणेशमूर्तीला पुजारी अजित कुलकर्णी यांनी पंचाभिषेक, जलाभिषेक, कुंकुमार्चन करून मूर्तीला अलंकार घातले. त्यानंतर अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. भाविकांच्या उपस्थितीत सामूहिक आरती व त्यानंतर तीर्थप्रसाद वितरण करण्यात आले. यावेळी मंदिराचे ट्रस्टी व भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.