प्रतिनिधी/कुंभोज
वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीसाठी मंगळवारी मतदान झाले. अत्यंत चुरशीने मतदान झाल्याने राजकारणाची समीकरणे बदलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, आज सकाळी मतमोजणीस सुरवात झाली असून निकालाच्या शेवटच्या टप्प्यात राजर्षी शाहू आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
महाडिक आघाडी 385 लिड
सोसायटी गटातून 11 जागा विजयी
हातकणंगले, मतदान केंद्रांवर सोसायटी गटात 455 पैकी महाडिक आघाडीस 288 मते तर महाआघाडीस 169 मते, मताधिक्य 130
इचलकरंजी, मतदान केंद्रांवर सोसायटी गटात 390 पैकी महाडिक आघाडीस 234 मते तर महाआघाडीस 156 मते, मताधिक्य 78
वडगाव मतदान केंद्रांवर सोसायटी गटात 645 पैकी महाडिक आघाडीस 408 मते तर महाआघाडीस 237 मते, मताधिक्य 194