प्रतिनिधी /बेळगाव
वडगाव येथील मंगाई देवीची यात्रा सलग दुसऱया वर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली. मंगळवार दि. 3 ऑगस्ट रोजी ही यात्रा होणार होती. परंतु यात्रेला होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करत मंगाई देवीच्या मानकऱयांनी ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
बेळगाव परिसरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून मंगाई देवीची यात्रा ओळखली जाते. दरवषी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी वडगाव येथे दाखल होतात. परंतु मागील वर्षापासून कोरोनाचा धोका वाढल्याने यात्रा रद्द करण्याची वेळ आली आहे. परंपरा खंडित होऊ नये यासाठी धार्मिक विधी केल्या जाणार आहेत. यात्रा रद्द करण्यात आल्याने मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन चव्हाण-पाटील कुटुंबीयांच्यावतीने करण्यात आले आहे.