वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्मार्टफोन बनवणारी कंपनी वन प्लसने जागतिक स्तरावर एक कोटी फोन्सची विक्री करण्याचा नवा टप्पा नुकताच प्राप्त केला आहे. या संदर्भातली माहिती कंपनीचे सीईओ पेटे लॉ यांनी नुकतीच दिली आहे.
कंपनीने नुकतीच आपली आठ वर्षे पूर्ण केली असून सदरचे उद्दिष्ट साध्य होणे हे कंपनीच्या यशासाठी साहय़ करणारे असेच ठरले आहे. एक कोटी फोन विक्रीचा टप्पा कंपनीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या वषी कंपनीने वन प्लस 9 आणि वन प्लस 9 प्रो हे स्मार्टफोन लॉन्च केले होते. ज्याला चांगला प्रतिसाद ग्राहकांनी नोंदवला होता. स्मार्टफोन्सला भारतीयांनी दाखवलेला विश्वास कंपनीच्या पुढील भविष्यकालीन कार्यासाठी प्रेरणा देणारा आहे. आता कंपनी लवकरच वन प्लस 10 सिरीज अंतर्गत स्मार्टफोन्स सादर करण्याची शक्मयता आहे.
वन प्लस 10 प्रो लवकरच लॉन्च
दरम्यान वन प्लसने आपल्या नव्या 10 प्रो स्मार्टफोनला लवकरच बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. सदरचा स्मार्टफोन 80 वॅटच्या फास्ट चार्जिंग सुविधेसह येणार असल्याची माहिती आहे. याशिवाय इतरही या फोनमध्ये वैशिष्टय़े असणार आहेत, असे सांगितले जात आहे. 6.7 इंच अमोलेड 2 के डिस्प्ले आणि स्पोर्ट पंच होल डिस्प्ले याला असणार असून 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही या फोनला असेल. क्वालकॉम स्नॅपड्रगन 8 चिपसेट असणार असून 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजची सोय या फोनमध्ये असणार आहे.