डॉ. आंबेडकर सेवा संघाचे निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
कायद्यानुसार ज्यांना वृध्दाप पेन्शन सुरू आहे, त्यांना पेन्शन द्यावी, काही जणांनी तक्रार केली असली तरी ज्यांचे वय योग्य आहे त्यांना पेन्शन देणे गरजेचे आहे. तेंव्हा अधिकाऱयांनी योग्य ती चौकशी करुन कायद्यानुसारच पेन्शन द्यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून वृध्द व्यक्तींना पेन्शन देण्यात येत आहे. मात्र चौकशीच्या नावाखाली काही जणांची पेन्शन प्रलंबित ठेवण्यात आली आहे. नाहक त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेंव्हा गांभीर्याने विचार करुन ज्यांना पेन्शन सुरू आहे त्यांना पेन्शन द्यावी, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.
महसुल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मल्लेश कुरंगी, एम. आर. कलपत्री, रामा चव्हाण, शानूर कंग्राळकर, जयप्रकाश कांबळे, उदय मेत्री, मनोहर मुचंडी, रघुनाथ कोलकार, कल्लाप्पा चौगुले, हणमंत तळवार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.