प्रतिनिधी / सातारा
सध्या लॉक डाऊनचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे. यामुळे जनजीवन तर विस्कळीत झाले आहे तसेच याचा अधिक फटका मोकाट जनावरांना देखील बसत आहे. कारण नागरिकांनी कोरोना विषाणूच्या धास्तीने स्वतःला घरात कैद करून ठेवले आहे. त्यामुळे या मोकाट जनावरांना खाण्यापिण्याची कोणतीच सोय सध्या उपलब्ध होत नाही. याची दखल घेत ट्राफिक पोलीस साबळे व हॉटेल चे मालक यांनी परिसरात असणाया मोकाट कुत्र्यांना खाद्य देऊन माणुसकीचे दर्शन दाखविले आहे.
पवई नाका येथे बुधवारी भर दुपारी काही श्वान अन्नाच्या शोधात इकडून तिकडे फिरताना दिसत होते. अन्न मिळविण्यासाठी ची त्यांची धडपड बघून येथे कार्यरत असलेल्या ट्राफिक पोलीस साबळे व हॉटेल भारत भुवनचे मालक त्या श्वानांच्या खाण्याच्या सोय केली.
सध्या कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने सर्वच भटक्या जनावरांचे मोठय़ा प्रमाणात खाण्यापिण्यासाठी हाल होताना दिसत आहेत. मनुष्याप्रमाणे या मुक्या जनावरांचा देखील जीवच आहे, याचा विचार करणे हे देखील तितकेच गरजेचे आहे.