कोल्हापूर शहरातील चार चित्रपटगृहे सुरू
प्रतिनिधी / कोल्हापूर
तब्बल एक वर्ष, एक आठवड्यानंतर शुक्रवारी शहरातील चार चित्रपटगृहांचे पडदे उघडले. या चित्रपट गृहांमध्ये दोन नवीन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले असून, प्रेक्षकांकडून पहील्याच दिवशी, पहील्या शो ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चारही चित्रपटगृहांमध्ये चार खेळ सुरू असून, शनिवार व रविवारी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी होणार असल्याची अपेक्षा चित्रपटगृह चालकांमधून व्यक्त केली जात आहे.
कोरोनामुळे देशातील मनोरंजन विभाग ठप्प झाला होता. चित्रपटगृहे बंद असल्याने, नवीन शूटींग व नवीन चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. पण शुक्रवारपासून कोल्हापूरातील पद्मा, शाहू, अप्सरा व उर्मिला हि चित्रपटगृहे सुरू झाली आहेत. सकाळपासून चार खेळ सुरू झाले आहेत. त्याचबरोबर शहरातील दोन मल्टीप्लेक्सही सुरू आहेत. चित्रपटगृहे सुरू करण्यापूर्वी चालकांनी विधिवत पूजा करून पहीला शो सुरू केला. यावेळी मालकांनी उपस्थिती लावली होती.
अप्सरा येथे सुनिल शेट्टी व काजल अग्रवालचा ‘अनू अँड अर्जून’ तर इतर तीन चित्रपटगृहामध्ये जॉन इबाहीमचा ‘मुंबई सागा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
“पहिल्या शो ला चांगला चांगला प्रतिसाद”
कोरोना नियमांनुसार चित्रपटगृह सुरू झाले. प्रत्येक खेळानंतर सॅनिटायझर मशिनव्दारे चित्रपटगृहामध्ये फवारणी करूनच दुसरा शो सुरू केला जात आहे. शनिवारनंतर चित्रपटगृहामध्ये गर्दी वाढणार आहे.
– गौरी ऋतुराज इंगळे