बेळगाव / प्रतिनिधी
वॉर्ड क्र. 49 मधील म. ए. समितीच्या अधिकृत उमेदवार वर्षा आजरेकर यांच्या बाजूने पंचमंडळी, महिला मंडळे, गणेशोत्सव मंडळे, युवक मंडळे, वॉर्डातील नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धारही केला आहे. मंगळवारी काढण्यात आलेल्या प्रचारफेरी दरम्यान सर्व स्तरातून पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
या प्रचारफेरीत म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रचारफेरीला मिळालेला प्रतिसाद मोठा होता. प्रचारफेरीत सर्व नागरिक सहभागी झाले होते. त्यांना विविध मंडळांचा पाठिंबा मिळत असल्याने मतदारांनी त्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे. वर्षा आजरेकर यांना जाहीर पाठिंबा देऊन मतदारांनी भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन शुभम शेळके यांनी केले.
याप्रसंगी मंगाईनगरचे पंच गंगाधर मासेकर, उचगावकर तसेच रामू चाळके, अर्जुनराव यळ्ळूरकर, हणमंत बाळेकुंद्री, उदय शिंदे, रमेश परदेशी, मदन मुचंडी, वैभव खवरे, युवक व महिला उपस्थित होत्या.