गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, दादांच्या स्मृमीस्थळाला दिली कुटुंबियांसमवेत भेट
प्रतिनिधी / कोल्हापूर
गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांनी आज महाराष्ट्र राज्याचे, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळास कुटूंबियांसमवेत अभिवादन केले. वसंतदादांमुळेच मला राजकिय दिशा मिळाली असे विश्वास पाटील यांनी सांगितले.
यावेळी जुन्या आठवणींना उजाळ देताना चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, ज्या दूध संस्थेच्या माध्यमातून माझी गोकूळ दूध संघातील मधील वाटचाल चालू झाली ती शाहू छत्रपती दूध संस्था, शिरोली दुमाला या संस्थेच्या स्थापनेवेळी मला स्वर्गीय वसंतदादांनी व त्यांचे सहकारी स्वातंत्र्य सेनानी शामराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यावेळी एक गाव एक दूध संस्था होती.
दुसरी संस्था काढणे त्या वेळच्या राजकीय परिस्थितीत शक्य नव्हते परंतु स्वर्गीय वसंतदादांनी तत्कालीन कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे दादांना सांगून ते आमचे स्नेही आहेत तरुण होतकरू आहेत त्यांना दूध संस्था रजिस्ट्रेशन व संकलनासाठी परवानगी तात्काळ द्या असा आदेश दादांनी तात्कालीन जिल्हाधिकार्यांना काढला. व सहाय्यक निबंधक दांडेकर यांनी 10 फेब्रुवारी 1978 रोजी सस्थेस नोंदणी प्रमाणपत्र व संकलनास परवानगी दिली गेली. या सस्थेची 43 वर्षाची यशस्वी वाटचाल चालू आहे. शाहू दूध संस्थेचा संस्थापक ते महाराष्ट्र राज्यातील सहकारातील अग्रगण्य गोकुळ दूध संघाचे चेअरमन हा राजकीय सामाजीक प्रवास दादांचे विचार व त्यांच्या सहकार्याची मला नेहमीच आठवण राहील.
यावेळी सांगलीचे माजी आमदार दिनकर पाटील, श्रीमती जयश्री मदन पाटील ,सांगली महानगर पालिकेचे उपमहापौर उमशे पाटील, तुकाराम पाटील, शंकरराव पाटील, अरविंद पाटील (पद्माळे), विष्णू आण्णा खरेदी विक्री संघाचे चेअरमन सग्रांमसिंह पाटील, विष्णू आण्णा खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक पाटील, दादांचे पणतू हर्षवर्धन प्रतिक पाटील, रयत संघाचे संचालक सचिन पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुनिल पाटील, राहूल पाटील, पार्थ पाटील तसेच पाटील कुटूंबीय उपस्थित होते.