प्रतिनिधी/ वाई
रोटरी क्लब ऑफ वाईतर्फे राज्यस्तरीय गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध भागातून आलेल्या गायकांनी आपले गाणे सादर केले. कोल्हापूर, भोर, बदलापूर, कोरेगाव, सोलापूर, वाई आणि बऱयाच लांबून लांबून स्पर्धकांनी या स्पर्धेसाठी भाग घेतला होता. सांस्कृतिक विभाग प्रमुख शांता येळंबकर यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रकल्प प्रमुख डॉ. रुपाली अभ्यंकर यांनी सर्वतोपरी स्पर्धकांशी व परीक्षकांची संवाद साधून उत्तम मार्गदर्शन केले. कॉर्डिनेटर डॉ. मनोहर दातार, मनिषा पोरे यांनी स्पर्धकांशी संपर्कात राहून संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी आत्मीयतेने पार पाडली.
त्याचबरोबर क्लबमधील सर्व रोटेरियनसनी या स्पर्धेमधील कलाकारांसाठी त्यांच्या चहापाण, कॉफीची व्यवस्था पार पाडली. तसेच तांत्रिक गोष्टी सांभाळल्या. सचिव डॉ. जितेंद्र पाठक यांनी स्वागत केले. रोटरीचे अध्यक्ष अजित क्षीरसागर यांनी आभार मानले. या स्पर्धेमध्ये 5 गट करण्यात आले होते. शालेय 18 वर्षाखालील, खुला गट 18 वर्षावरील, युगल गीत, सांघिक व रोटरी. यामध्ये 18 वर्षा खालील गटांमध्ये प्रथम क्रमांक दिव्या मगदूम, कोल्हापूर, द्वितीय क्रमांक रणवीर सूर्यवंशी, तृतीय क्रमांक अवधूत पाठक यांनी पटकावला. युगल गीतामध्ये प्रथम क्रमांक संकेत गरगटे व प्रियांका भिलारे, द्वितीय क्रमांक रूपाली अभ्यंकर व प्रेरणा ढोबळे यांनी पटकावला. खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांक संकेत गरगटे, द्वितीय क्रमांक प्रियांका भिलारे व तृतीय क्रमांक स्वाती सूर्यवंशी यांनी पटकावला आणि रोटरी ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक डॉ. जितेंद्र पाठक, द्वितीय क्रमांक डॉ. मनोहर दातार आणि तृतीय क्रमांक अजित क्षीरसागर यांनी पटकावला.