ओळख पटल्यास ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गेल्या तीन वर्षांपासून दोघांचा शोध घेण्यात येत आहे. तीन वर्षांनंतरही त्यांचा थांगपत्ता लागला नसून पोलिसांनी मात्र प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत.
वाघवडे (ता. बेळगाव) येथील एक युवक गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता झाला आहे. लक्ष्मण कृष्णा दिवटगी (वय 40) असे त्याचे नाव आहे. 10 मे 2018 रोजी दुपारी तो आपल्या घराबाहेर पडला होता. तो अद्याप घरी परतला नाही. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
भवानीनगर-मंडोळी रोड येथील विलास कल्लाप्पा गुरव (वय 50) हे 10 नोव्हेंबर 2019 पासून बेपत्ता झाले आहेत. त्या दिवशी सकाळी 10.30 वाजता ते घरातून केस कटींग करण्यासाठी जावून येतो असे सांगून बाहेर पडले आहेत. ते अद्याप परतलेच नाहीत. त्यांच्या पत्नीने बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यांच्याविषयी माहिती मिळाल्यास 0831-2405252 या क्रमांकावर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.