प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयात वेगवेगळय़ा भागांमध्ये दोन दिवसांपूर्वी पडलेल्या वादळीवाऱयासह पाऊस आणि वीज कोसळल्यामुळे नागवे येथील चंद्रावती परवार यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी परवार कुटुंबियांनी केली आहे.
दोन दिवसापूर्वी सत्तरी तालुक्मयाच्या अनेक भागामध्ये वादळी वाऱयासह पाऊस झाला होता. याचवेळी गडगडाटासह विजेचा लोळ पडल्यामुळे नागवे सत्तरी येथील चंद्रावती परवार हीच्या घरावर वीज पडल्यामुळे त्यांच्या घराची मोठे नुकसान झाले. यामध्ये घराचे छप्पर उडून गेले त्याशिवाय घरातील सामानाची मोठय़ा प्रमाणात हानी झाल्याची माहिती चंद्रावती परवार यांनी दिली.
परवार कुटुंबीय आर्थिक स्थिती खुपच कमकुवत आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे सदर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. नैसर्गिक स्तरावर झालेल्या नुकसानीची गंभीर दखल सरकारने घ्यावी व सदर कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात द्यावा अशा प्रकारची मागणी सदर कुटुंबियांनी केली आहे.