ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मागील आठवडाभरातील दरवाढीनंतर आज भारतीय बाजारात सोने आणि चांदीचे वायदे दर घसरले. एमसीएक्सवर सोन्याचे वायदे 0.1 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 46,793 रुपयांवर, तर चांदीचे वायदे 0.4 टक्क्यांनी घसरून 67,240 रुपये प्रति किलो वर आले आहेत. मागील दोन सत्रांमध्ये सोन्यात प्रति 10 ग्रॅम 1000 रुपयांची वाढ झाली होती. तेव्हा सोन्याचे दर 44,100 प्रति 10 ग्रॅम होते.
अमेरिकन बाजारातील स्थिती
जागतिक बाजारपेठेत अमेरिकन डॉलरच्या कमजोरीमुळे सोन्याचे दर एक महिन्याच्या उच्चांकावर स्थिर होते. स्पॉट गोल्ड 1755.91 डॉलर प्रति औंस वर स्थिर राहिले. या आठवड्यात आतापर्यंत सोने 1.5 टक्क्यांनी वाढले असून, अमेरिकेच्या रोखे उत्पन्नात घट झाली आहे. चांदी 25.45 डॉलरवर स्थिर होती, तर प्लॅटिनम 0.3 टक्क्यांनी घसरून 1225.95 डॉलर झाले.