वाळपई / प्रतिनिधी
वाळपई नगरपालिकेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी अनुक्रमे सेहझीन शेख व अनिल काटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. या संदर्भात निवडणूक आज 1 एप्रिल रोजी काळी 11 वाजता निश्?चित करण्यात आलेली आहे.
याबाबतची माहिती अशी की वाळपई नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रभाग क्रमांक 10 च्या नगरसेविका सेहझीन शेख व उपनगराध्यक्ष पदासाठी प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक अनिल काटकर यांची निवड होणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी घोषित केले होते. त्यानुसार त्यांनी आज निवडणूक अधिकाऱयांकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज छाननी होणार असून त्यानंतर अधिकृतरित्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची निवड होणार असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भाची प्रक्रिया नगरपालिकेच्या कक्षात होणार आहे.