वृत्तसंस्था/ मँचेस्टर
विंडीज क्रिकेट संघाचा 14 दिवसांचा आयसोलेशन कालावधी सोमवारी इंग्लंडमध्ये पूर्ण झाला. आता हा संघ पुढील महिन्यात होणाऱया कसोटी मालिकेच्या पूर्वतयारीला प्रारंभ करेल. मँचेस्टरमध्ये तीन दिवसांचा सरावाचा सामना खेळविला जाणार आहे.
विंडीज क्रिकेट संघाला मँचेस्टरच्या ओल्ड ट्रफोर्ड क्रिकेट मैदानावर क्वारन्टाईनसाठी ठेवण्यात आले होते. या मैदानाच्या शेजारी एका हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. 9 जून रोजी विंडीजचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. इंग्लंड संघाच्या सरावाला गुरूवारपासून प्रारंभ होणार आहे. इंग्लंडचा संघ तीन दिवसांचा सरावाचा सामना खेळणार असून हा सामना 1 जुलैपासून खेळविला जाईल. विंडीज आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी 8 जुलैपासून सुरू होणार आहे. या कसोटीला प्रारंभ करण्यापूर्वी इंग्लंडमधील कोरोना योद्धय़ांचा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. कोरोना योद्धय़ामध्ये शिक्षक, डॉक्टर्स, नर्सेस, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे.