वृत्तसंस्था/ सेंट जोन्स
सध्या लंकन क्रिकेट संघ विंडीजच्या दौऱयावर आला आहे. विंडीज आणि लंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका मार्च महिन्यात आयोजित केली असून या मालिकेसाठी विंडीज संघाच्या कर्णधारपदी क्रेग ब्रेथवेटची नियुक्ती करण्यात आली आहे.
विंडीज कसोटी संघाचे नेतृत्व यापूर्वी जेसॉन होल्डरकडे सोपविण्यात आले होते. पण विंडीजच्या निवड समितीने या मालिकेसाठी क्रेग ब्रेथवेटकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. बेथवेटने यापूर्वी 7 कसोटी सामन्यात विंडीजचे नेतृत्व केले आहे. अलीकडेच होल्डरच्या नेतृत्वाखाली विंडीज संघाने बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली आहे. लंका आणि विंडीज यांच्यातील पहिली कसोटी 21 ते 25 मार्च दरम्यान होणार आहे. या कसोटीसाठी विंडीजच्या निवड समिती संघाची घोषणा लवकरच करणार आहे. 29 वर्षीय होल्डरची 2015 साली विंडीज कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. बांगलादेशच्या दौऱयामध्ये कर्णधार होल्डरसह विंडीजच्या अन्य बऱयाच क्रिकेटपटूंनी कोरोनाच्या भीतीमुळे आपला सहभाग दर्शविला नव्हता. आयसीसीच्या ताज्या अष्टपैलू कसोटी मानांकनात होल्डर अग्रस्थानावर आहे. त्याने 37 कसोटीत विंडीजचे नेतृत्व केले असून 11 सामने जिंकले, 5 सामने अनिर्णित राखले तसेच 21 सामने गमविले आहेत.