खरेदी करणं ही मुळात एक कला आहे. अंगच्या कलेला नीट पैलू पाडावे लागतात. ती विकसित करावी लागते. तेव्हाच आपण उत्तम कलाकार होतो. खरेदीची म्हणजे शॉपिंगची कला कशी विकसित करायची याविषयी…
- बरेच लोक रविवारी किंवा इतर सुट्टीच्या दिवशी खरेदीला बाहेर पडतात. फिरण्यासाठी किंवा फॅशनविश्वातले नवे ट्रेंड्स समजून घेण्यासाठी हा दिवस योग्य असला तरी खरेदी करण्यासाठी इतर दिवशी बाहेर पडायला हवं.
- योग्य फिटिंगचे कपडे खरेदी करणं खूप आवश्यक असतं. सहज म्हणून कपडय़ांची खरेदी करायची आणि घरी आल्यावर ते सैल झाले तर बदलून आणणं जीवावर येतं. त्यामुळे कपडे खरेदी करण्याआधी ते घालून बघायला हवेत. म्हणूनच ट्रायल रुम असणार्या दुकानातूनच कपडय़ांची खरेदी करा.
- नियमित वापरासाठी कपडय़ांची खरेदी करणार असाल तर ड्राय क्लीन करायला लागणार्या कपडय़ांऐवजी घरी धुता येण्यासारखे आणि कमी देखभालीची गरज असणारे कपडे घ्या.
- दागिने खरेदी करताना नेमकं काय घ्यावं असा प्रश्न पडत असेल तर नव्या ट्रेंड्सची माहिती करूनच खरेदीसाठी बाहेर पडा. यामुळे तुमचा वेळ वाचेल. खरेदीही झटपट होईल आणि मनपसंत वस्तू घरी आणता येईल.