वाहतुकीचा बोजबारा,सोशल डिस्टींगशनचा फज्जा
प्रतिनिधी / कोल्हापूर
शनिवार व रविवार या दोन दिवशीय कडकडीत विकेंड लॉकडाऊननंतर, गुढी पाडव्याच्या खरेदीसाठी सोमवारी संपूर्ण शहर रस्त्यावर उतरले होते. कडकडीत उन्हातच सोशल डिस्टींगशनचा फज्जा उडवतच, वाहनासह पायी चालणाऱया लोकांची मोठी गर्दी झाली होती. पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार या धास्तीने शहरातील सर्व बाजारपेठामध्ये, सकाळपासूनच गर्दीच-गर्दी झालेली दिसत होती. मंगळवारी गुडीपाडवा असल्याने व दुकाने पाचनंतर बंद राहणार असल्याने, सकाळपासूनच खरेदीसाठी ही गर्दी झाली होती.
राज्य सरकारने कडकडीत विकेंड लॉकडाऊन जाहीर केल्याने, शनिवार व रविवारी रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्रिज ऍन्ड ऍग्रीकल्चर बैठकीत, व्यापाऱयांच्या लॉकडाऊनबाबत शासनाने रविवारपर्यंत निर्णय न दिल्यास, सोमवारपासून आपली दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी सायंकाळपर्यंत शासनाचा निर्णय झाला नाही. यामुळे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिलेल्या निर्णयानुसार,, सोमवारी कोल्हापूर जिल्हयातील सर्व दुकाने सुरू करण्यात आली.
शहर रस्त्यावर
दोन दिवसाचा कडक विकेंड लॉकडाऊन, मंगळवारी गुढी पाडवा व आगामी काळातील लॉकडाऊनच्या धास्तीने सोमवारी खरेदीसाठी शहरातील लोक ऐन उन्हात रस्त्यावर उतरले होते. . पादचाऱयासह वाहनांची मोठी गर्दी झाल्याने,शहरातील वाहतूक पूर्णपणे कोलमडून गेली होती. पोलिस व ट्रफीफ पोलिसांना या गर्दीवर नियंत्रण ठेवणे अवघड झाले होते. ही गर्दी म्हणजे दिवाळीची आठवण करून देणारी ठरली आहे.
वाहतूक कोलमडली
शहरातील मुख्य रस्त्Îावर खरेदीसाठी पादचारी व वाहनाधारकांची मोठी गर्दी झाली होती. बिंदू चौक,महाव्दार रोड,शिवाजी रोड,पापाची तिकटी,लक्ष्मीपुरी येथे खरेदी करण्यासाठी येणाऱया लोकांची झुंबड झाल्याने, कोलमडलेल्या वाहतूकीवर नियंत्रण ठेवणे अवघड झाले होते. वाहतूक कोलमडल्याने,वाहनांचे हॉर्न,मार्ग काढण्यासाठी वाहनधारकांची रस्सीखेच सुरू होती.
बाजारपेठा फुल्ल
गुढी पाडवा व लग्नसराईचा सिझन असल्याने, तसेच दोन दिवसाच्या विकेंड लॉकडाऊननंतर सोमवारी शहरातील बाजारपेठामध्ये खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी झालेली होती. यामुळे सर्व बाजारपेठा फुल्ल असल्याच्गो दिसत होते.
पाडव्याच्या पूजनासाठी लागणाऱया फूलांच्या खरेदीसाठी सकाळी शिंगोशी मार्केटमध्ये मोठी गर्दी झाली होती. सोन्याच्या दर वाढून देखील,लग्नसराई व गुढी पाडव्यासाठी गुजरीमध्ये सोने खरेदीसाठी गदीं होती. गुजरीतील कांही दुकाने पूर्णपणे उघडी होती. महापालिकेची गाडी दुकाने बंद करण्याचे आवाहन करत असताना, सराफाकडून अर्धे शटर बंद केले जात होते. लग्न सराई असल्याने, लक्ष्मी रोड,महाव्दार रोड,जोतिबा रोड,शिवाजी चौक येथे कपडे व भांडी खरेदीसाठी मोठया प्रमाणावर गर्दी होती. तर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स व वाहन शोरूम फुल्ल होते
भाजीपाला,फळे,धान्य खरेदीसाठी लक्ष्मीपुरी,कपिलतिर्थ,शिवाजीमार्केट येथे पाय ठेवण्यासही जागा नव्हती.
बँकामध्ये गर्दी
दुसरा शनिवार व रविवारची सुट्टी अशा सलग दोन दिवसाच्या सुट्टीमुळे बँका बंद होत्या. मंगळवारी गुढी पाडवा असल्याने,पैसे काढण्यासाठी बँक ग्राहकांची सोमवारी सकाळपासूनच रांग लागली होती.