प्रतिनिधी / बेळगाव
विजया ऑर्थो ऍण्ड ट्रॉमा सेंटर येथे जागतिक नर्सिंग डे साजरा करण्यात आला. हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवी पाटील यांनी हॉस्पिटलमधील सर्व नर्सिंग स्टॉफला शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कोरोनाकाळात सर्व नर्स योद्धय़ा बनून कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. हॉस्पिटलचे पीआरओ वीरेश हिरेमठ यांनी सर्वांना गुलाब पुष्प व मिठाई दिली. याप्रसंगी ओंकार पावशे, नवीन रेड्डी, आदर्श कांबळे आदी उपस्थित होते.