11 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा : आनंद अकादमी उपविजेते, महमद हमजा मालिकावीर, अर्जुन येळ्ळूरकर सामनावीर
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
आनंद क्रिकेट अकादमी आयोजित आनंद चषक 11 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजया क्रिकेट अकादमी संघाने आनंद क्रिकेट संघाचा 11 धावांनी पराभव करुन आनंद चषक पटकाविला. महमद हमजाला मालिकावीर तर अर्जुन येळ्ळूरकरला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
भुतरामहट्टी येथील भरतेश स्कूल मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात विजया क्रिकेट अकादमी संघाने 25 षटकात सर्वबाद 142 धावा केल्या. त्यात अर्जुन येळ्ळूरकरने 6 चौकारासह 43, अदिती भोगणने 3 चौकारासह 27 धावा केल्या. विजयातर्फे अद्वैत चव्हाणने 30 धावांत 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमी संघाने 25 षटकात 4 बाद 131 धावाच केल्या. त्यात समर्थ करडीने 30, अमर पटवेगारने 23 धावा केल्या. विजयातर्फे मयांक पाटीलने 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे रमेश चिवटे, दर्शन गडकरी, प्रविण गुंडप, आनंद करडी, मिलिंद चव्हाण, हेमंत यादव यांच्या हस्ते विजेत्या विजया क्रिकेट अकादमी व उपविजेत्या आनंद अकादमी संघाला चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर व उत्कृष्ट फलंदाज अर्जुन येळ्ळूरकर (विजया), उत्कृष्ट गोलंदाज अथर्व करडी (आनंद), मालिकावीर महमद हमजा (विजया) यांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आनंद अकादमीच्या सहकाऱयांनी विषेश परिश्रम घेतले.