प्रतिनिधी / विटा
ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त, कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा विटा पालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
ठाण्यातील, माजीवाडा प्रभाग समिती हद्दीमध्ये अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनाधिकृत हातगाड्यावर कारवाई करत असताना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे हातगाडी फेरीवाले. अरजीत यादव यांनी त्यांच्यावर कल्पिता पिंपळे व त्यांचा अंगरक्षक, सोमनाथ पालवे यांच्यावर परप्रांतीयाने जीवघेणा हल्ला केला. त्या निषेधार्थ विटा नगरपरिषदेचे अतुल पाटील मुख्याधिकारी, सर्व अधिकारी व कर्मचारी संघटनेच्यावतीने 31 ऑगस्ट 2021 रोजी एक दिवसाचे नगरपरिषदेचे दैनंदिन कामकाज बंद करुन जाहीर निषेध केला.